September 6, 2013

Collaborating with Students

India is also called as "Young nation" as more than 65% of Population is under 30 and well educated. It is necessary to target young blood whenever you want to change something - economically, socially. This 65% population is enough to turn any rock and is major deciding factor of future of India. Aim of Kshitij Group is to successfully execute nirmalya project and to reach towards this audience.

Kshitij Group itself is a bunch of young people. We decided to consider more younger buds. That is why we are collaborating with students. We visited few secondary schools to ensure we can interact with students. Their state is like a 'soft iron' - so strike right to mold them in right direction. When we began interaction after a warm welcome; we got fabulous response. Every student excited and trying to put their views before us. What we observed? - we observed:
1. It is so easy to convey your thoughts to them
2. You can't match with their energy and imagination
3. Their doubts is solution to your problems
4. When they say 'yes' - they do it for you in very unselfish manner

One of them asked question : "आम्ही जागे आहोत म्हणून आम्हीच पाळत ठेवणे - हे कितपत योग्य आहे?" His urge to make others aware far more than us. 

निर्माल्य प्रकल्पात विद्यार्थ्यांचा समावेश ही अत्यंत आनंदाची आणि प्रेरणादायक बाब आहे. त्यांचे कार्य आणि सहभागाबद्दल आम्ही भरपूर उत्सुक आहोत. या उपक्रमातून त्यांना बरेच काही शिकायला मिळेल, ते घडतील हीच आशा. 

A lot to learn from them. Young buds surprised us - responded beyond expectations. We want that excitement to keep breezing. Now they are also part of nirmalya project. Now they are more aware about nirmalya disposal, pollution etc. With the help of this project they will surely learn social values, hardwork, teamwork, managing resources, using 'word of mouth' etc. This is really beneficial and will work in our favor. We are really inspired by their participation and hence we added something extra - the activity for kids only. We planned to giveaway excellent goodies to them after Ganesha festival. As we are getting their help in return we want to see them happy and surprised. This will help as booster or encouragement to them and they can happily join us again and again for social activities, and those who denied to participate may join us next time by such reward program. Details of reward program coming in very next post.

Kshitij is ready with new Jr. team to tackle pollution - feel free to join us and to make our city clean. cleaner. cleanest. The only suggestion is to allow futures to work with you so that in future their present will be perfect. 

September 4, 2013

Donate Nirmalya Campaign - निर्माल्यदान

।। करून निर्माल्य दान ठेवु जबाबदारीचे भान ।।
।। निर्माल्यापासून करून निर्मिती खताची, करूया सुरक्षा आपल्या पर्यावरणाची ।।

सर्व गणेश भक्तांना विनम्र अभिवादन !
आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव आला आहे. गणेशाचा हा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच ! हा उत्सव साजरा करताना आपण कोणतीच काटकसर करत नाही. परंतु आपल्याही नकळत पर्यावरणाच्या प्रदुषणाची किनार या उत्सवाला लागते.

गणेश उत्सवात तयार होणारे निर्माल्य; हार, फुले पाण्याच्या ठिकाणी अथवा इतरत्र टाकले जाते व पर्यावरण प्रदुषणात भर पडते. खुदद गणरायाला सुद्धा हि गोष्ट आवडत नसावी.

प्रदुषणाचे हे प्रमाण कमी करण्यासाठी निर्माल्याचा वापर करून नैसर्गिकरित्या खत तयार करण्याचा उपक्रम क्षितीज ग्रुप तर्फे कल्याण (पुर्व) आणि विक्रोळी (पच्छिम) येथे गणेशोत्सव काळात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जमा होणारे निर्माल्य गोळा करण्यात येईल.

निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प या अंतर्गत सन २०१२ मध्ये, क्षितीज ग्रुप तर्फे कल्याण (पुर्व) येथे अंदाजे ४ टन [४००० किग्र ] निर्माल्य गोळा करण्यात आले होते. निर्माल्याचे नैसर्गिक खत तयार करण्यात त्यांना यश आले होते. या वर्षी आणखी जोमात कार्य करण्याचे क्षितीज ग्रुपने ठरवले असून २०१३ म्हणजे यंदाच्या साली तिप्पट [१२ टन ] एवढे निर्माल्य गोळा करण्याचे प्रयत्न ते करू इच्छितात.

अशाच प्रकारे अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ, निसर्ग प्रेमी आणि महानगरपालिका आपापल्या परीने अशेच अनेक उपक्रम राबू पाहत आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई सारख्या शहरांत इको फ्रेंडली आणि प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाचे क्रेझच आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या जनजागृतीचे आणि शिक्षणाचे 'positive' पडसात उमटत आहेत हि आनंदाची बाब.

पाणी, वातावरण व पर्यावरण याच्या प्रदूषणाचे काय? त्यामुळे क्षितीज ग्रुप तर्फे सगळ्यांस विनंती करण्यात येते की - आम्हाला [किंवा नजीकच्या स्वयंसेवी संस्थाना ] निर्माल्य दान करा. संपूर्ण निर्माल्याची केवळ खत निर्मिती करण्यात येईल.

हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवून कल्याण आणि विक्रोळी शहरातील गणेशोत्सव पर्यावरण पुरक करण्यासाठी आपणाकडून अपेक्षा आहे. कारण ती देखील गणरायाची केलेली सेवाच असेल. तुमच्या कडील निर्माल्य जमा करण्यासाठी क्षितीज ग्रुपशी संपर्क साधावा.

कल्याण : ९०२९७९६४९६, ८०९७६१५८४३, ९२२१०२७३७३
विक्रोळी : ८६९३८४०६५८
email : kshitijgroupkyn@gmail.com


चला आता करूया एक पण, कोमेजलेले फुल वा जिर्ण झालेले पर्ण । नदी - नाल्या नव्हे, झाडांनाच करू अर्पण ।।


September 3, 2013

Take responsibility to dispose nirmalya properly

One of the biggest outputs of Ganesh Chaturthi Festival is tonnes of 'Nirmalya' - the offerings collected during the immersion. These offerings are made of several items : flowers, fruits, garlands, coconuts etc natural items. Traditionally these items were meant to be immersed with the Ganesh idols, as an offering back to nature. But immersion of Nirmalya is done on very large scale causing problems that adds to water pollution.

Nirmalya is something that offered before the Lord Ganesh and hence it holds holy respect. People prefer to keep it away from trample and garbage by disposing it into water. Due to such high spirit it becomes more difficult to convey and make understand people that they are adding to water pollution.

Past few years it is observed that people are more aware about this still there is need to reach to every single individual. Metro cities in Maharashtra such as Mumbai, Pune, Thane faces more such problems. But in last few years it is observed that many youth groups, NGOs, Nature Lovers are arranging camps, events, disposal projects to spread awareness and reduce water pollution. Even Municipal Corporations are backing up, supporting all such activities and providing nirmalya kalash for proper disposal.

According to our survey and stories published in Maharashtra Times : In Sept 2012, collection of Nirmalya by different organisations in different cities for processing it into fertilizer is tabulated as follows

CityNirmalya collected[in ton]
Thane100
Pune45
Mumbai40
Nasik30

It helped to reduce water pollution to some extent but still thousand of tons of Nirmalya disposed into water. This year also there are many organisations ready and belt up to spread more awareness and arrange all such activities in conjunction with Municipal Corporation. The aim is to reduce water pollution, spread more awareness, give it back to nature as fertilizer [निर्माल्य निसर्गाकडून निसर्गाकडे], to collect more Nirmalya than previous year. Every individual who is reading this article and thinks he can change this - so join in, lend some helping hands, you can do this by :


1. Spreading words and sharing thoughts on your social profiles [Facebook, Twitter, Gplus, Whatsapp]: 
"Green joy | Green thinking | Green festival - say no to pollution"
"हरीत आनंद । हरीत विचार । हरीत उत्सव - निर्माल्य निसर्गाकडून निसर्गाकडे"
2. Meet people and talk to them - with teaching aids such as chart, pictures, newspapers
3. Put nirmalya box or nirmalya kalash in your region and take responsibility to give it to organisations that processes it.
4. Create team that can work ward wise, take help of corporator[नगरसेवक] or regional Municipal officer.
5. Make list of organisations with their contact info and share it with people and ask people to give nirmalya to such organisations.
Simplest thing to just pass your words to every second individual you meet. You can! yes we all can reduce it.recycle it.

Vermicompost [गांडूळ खत]

Vermicompost is process of composting using various worms [ In this project we are using red worm 'Eisenia Foetida'] to create heterogeneous mixture of decomposing vegetables, flowers, fruits or food waste. Vermicompost is an excellent, nutrient rich organic fertilizer and soil conditioner. It contains water soluble nutrients. 


गांडूळ खत
१. गांडुळ जीवनक्रम - गांडुळाच्या जीवनामध्ये अंडी, बाल्ल्यावस्था आणि पुर्णावस्था अशा तीन अवस्था असतात. या सर्व अवस्थासाठी ओलसर जमीन आवश्यक असते. गांडुळाचा जीवनक्रम प्रामुख्याने त्याच्या जातीवर अवलंबून असतो. पूर्ण वाढ झालेल्या गांडूळामध्ये स्त्री आणि पुरूष जनन असे दोन्हीही अवयव असतात. गांडुळ प्रत्येक सहा ते सात दिवसांनी अंडी टाकते. या अंड्यामध्ये दोन ते वीस गर्भ असतात. अंडी अवस्था हवामानाचे अनुकुलतेनुसार ७ ते २० दिवसांची असते. गांडुळाची अपुर्णावस्था दोन ते तीन महिन्याची असते. त्यानंतर तो जेव्हा पूर्णावस्थेत येतो तेव्हा तोंडाकडील २ ते ३ सें.मी. अंतरावरील अर्धा सें.मी. आकाराचा भाग जाड होतो. हे वयात आलेल्या गांडूळाचे लक्षण होय. सर्वसाधारणपणे गांडुळाचे आयुष्य दोन ते तीन वर्षाचे असते. इसिनीया फेटीडा या जातीच्या पूर्ण वाढ झालेल्या गांडुळाची लांबी १२ ते १५ सें.मी. असते. एका किलोमध्ये सर्वसाधारणपणे पूर्ण वाढ झालेली एक हजार गांडुळे बसतात. अशी एक हजार गांडूळे घेवून त्यांची अनुकुल वातावरणात वाढ केल्यास एका वर्षात त्यांची संख्या आठ लक्ष त्र्याएंशी हजार होते. पिले व प्रौढ गांडुळे एका किलोमध्ये दोन हजार बसतात. शंभर किलो प्रौढ गांडुळे महिन्याला एक टन गांढूळखत तयार करतात. 
२. गांडुळ संवर्धन आणि गांडूळखत निर्मीती
२अ. जागेची निवड व बांधणी - गांडूळ पैदास करण्याच्या जागेची निवड करताना जमीन पाण्याचा निचरा होणारी असावी. तसेच खड्ड्याच्या जवळपास मोठी झाडे असू नयेत, कारण या झाडाची मुळे गांडुळखतामधील पोषक घटक शोषून घेतात. गांडूळखत तयार करण्यासाठी सावलीची आवश्यकता असल्याने त्यासाठी छप्पर तयार करून घ्यावे. ते तयार करताना रुंदी साडेपाच मिटर, मधील उंची ३ मिटर, बाजूची उंची १ मिटर आणि लांबी गरजेनुसार म्हणजे उपलब्ध होणारे शेणखत व छप्परासाठी लागणारे साहित्य यानुसार ५ ते २५ मिटर पर्यंत असावी. छप्परामध्ये १ मिटर रुंद व २० सें.मी. खोलीचे दोन समांतर चर खोदावेत.
२ब. गांडुळ खाद्य - चराच्या तळाशी ८ ते ९ सें.मी. उंचीचा किंवा जाडीचा थर काडीकचरा, पालापाचोळा, वाळलेले गवत, उसाचे पाचरट यांनी भरावा. त्यावर पाणी मारावे. याथरावर ८ ते ९ सें.मी. जाडीचा दुसरा थर कुजलेले शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत यांचा द्यावा. त्यावर ओले होईपर्यंत पाणी शिंपडावे, त्यानंतर या थरावर गांडुळे सोडावीत. यावर ५ ते ६ से.मी. जाडीचा थर कुजलेले सेंद्रीयखत, शेणखत यांचा थर द्यावा. या थरावर २० ते ३० सें.मी. उंचीपर्यंत शेणखत, लेंडीखत, सेंद्रीयखत टाकावे. यावर ओले होईपर्यंत पाणि शिंपडावे. हा गादीवाफा गोणपाटाने झाकावा. दररोज या गादीवाफ्यावर पाणी शिपडावे म्हणजे गादीवाफ्यात ओलसरपणा टिकून राहील आणि गांडुळाची चांगली वाढ होऊन गांडूळखत तयार होईल. या पध्दतीने १५ ते २० दिवसात गांडूळखत तयार होते. - शेणखतामध्ये गांडुळाची वाढ उत्तम होते. त्यांची संख्या जोमाने वाढून गांडूळखत उत्तम प्रतीचे तयार होते. त्याचप्रमाणे लेंडीखत, घोड्याची लिद यापासून सुध्दा गांडूळखत तयार होते. गांडुळासाठी लागणारे खाद्य कमीतकमी अर्धवट कुजलेले असावे. शेणखत आणि सेंद्रीयखत यांचे मिश्रण अर्धे- अर्धे वापरून गांडूळखत करता येते. गांडूळामध्ये शेतातील ओला पाला-पाचोळा, भाजी पाल्याचे अवशेष, अर्धवट कुजलेले पिकांची अवशेष, साखर कारखान्यातील प्रेसमड याचा वापर होऊ शकतो. मात्र हे खाद्य गांडुळासाठी वापरताना काही प्रमाणात (एक तृतीअंश) शेणखत मिसळणे आवश्यक आहे. गांडुळखत नेहमी बारीक करून टाकावे. बायोगँस प्लँन्टमधून निघालेली स्लरीसुध्दा गांडुळखाद्य म्हणून उपयोगात आणता येते. खड्ड्यामध्ये गांडुळे टाकण्या अगोदर गांडुळखाद्यावर चार-पाच दिवस सारखे पाणी मारावे म्हणजे त्यातील गरमपणा नष्ट होईल. सुक्ष्म जीवाणू संवर्धक (बँक्टेरीअल कल्चर) वापरून खत कुजविण्याचा प्रक्रीयेस वापरावे. वरील संवर्धक प्राध्यापक, वनस्पती रोगशास्त्र विभाग, कृषि महाविद्यालय पुणे-५ यांच्याकडे उपलब्ध होऊ शकेल. या व्यतीरीक्त गांडूळ खाद्यात एक किलो युरीया व एक किलो सुपरफॉस्फेट प्रति टन या प्रमाणात मिसळले असता कुजण्याची क्रीया लवकर होवून गांडूळखत लवकर तयार होईल. गांडुळ संवर्धनात घ्यावयाची काळजी - गांडूळाची १०C  ते ३०C एवढया तापमानात वाढ होते. त्यामुळे मिश्रणाचे तापमान वाढू न देण्यासाठी सतत त्यावर पाणी शिंपडावे.
३. गांडूळखत वेगळं करणे - गांडुळखत आणि गांडुळे वेगळे करताना उन्हामध्ये ताडपत्री अथवा गोणपाट अंथरून त्यावर या गांडूळ खताचे ढिग करावेत, म्हणजे उन्हामुळे गांडुळे ढिगाच्या तळाशी जातील व गांडूळे आणि गांडुळखत वेगळे करता येईल. शक्यतो खत वेगळे करताना टिकाव, खुरपे यांचा वापर करू नये म्हणजे गांडूळांना इजा पोहचणार नाही. या व्यतीरीक्त दुसऱ्या पध्दतीप्रमाणे गादीवाफ्यावर तयार झालेला गांडूळखताचा थर हलक्या हाताने गोळा करून घ्यावा व वाफ्यावर पुन्हा नवीन खाद्य टाकावे. या गांडुळखतामध्ये गांडूळाची अंडी, त्यांची विष्ठा आणि कुजलेले खत यांचे मिश्रण असते. असे गांडुळाचे खत शेतामध्ये वापरता येते. निरनिराळ्या पिकासाठी हे खत हेक्टरी पाच टन प्रती वर्ष या प्रमाणात टाकावे.
४. गांडुळखताचे फायदे
१) जमिनीचा पोत सुधारतो. 
२) मातीच्या कणांच्या रचनेत योग्य असा बदल घडविला जातो. 
३) गांडुळाच्या बिळांमुळे झाडाच्या मुळांना इजा न होता उत्तम मशागत केली जाते. 
४) जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता वाढते. 
५) जमिनीची धूप कमी होते. 
६) बाष्पीभवनाचे प्रमाण कमी होते. 
७) जमिनीचा सामू (पी.एच) योग्य पातळीत राखला जातो. 
८) गांडूळ खालच्या थरातील माती वर आणतात व तिला उत्तम प्रतीची बनवतात. 
९) गांडुळखतामध्ये ह्युमसचे प्रमाण भरपूर असल्यामूळे नत्र, स्फुरद, पालाश व इतर सुक्ष्मद्रव्य झाडांना भरपूर व लगेच उपलब्ध होतात. 
१०) जमिनीतील उपयुक्त जिवाणूंचा संख्येत भरमसाठ वाढ होते.