September 4, 2013

Donate Nirmalya Campaign - निर्माल्यदान

।। करून निर्माल्य दान ठेवु जबाबदारीचे भान ।।
।। निर्माल्यापासून करून निर्मिती खताची, करूया सुरक्षा आपल्या पर्यावरणाची ।।

सर्व गणेश भक्तांना विनम्र अभिवादन !
आपल्या लाडक्या गणरायाचा उत्सव आला आहे. गणेशाचा हा उत्सव म्हणजे आपल्या सर्वांसाठी पर्वणीच ! हा उत्सव साजरा करताना आपण कोणतीच काटकसर करत नाही. परंतु आपल्याही नकळत पर्यावरणाच्या प्रदुषणाची किनार या उत्सवाला लागते.

गणेश उत्सवात तयार होणारे निर्माल्य; हार, फुले पाण्याच्या ठिकाणी अथवा इतरत्र टाकले जाते व पर्यावरण प्रदुषणात भर पडते. खुदद गणरायाला सुद्धा हि गोष्ट आवडत नसावी.

प्रदुषणाचे हे प्रमाण कमी करण्यासाठी निर्माल्याचा वापर करून नैसर्गिकरित्या खत तयार करण्याचा उपक्रम क्षितीज ग्रुप तर्फे कल्याण (पुर्व) आणि विक्रोळी (पच्छिम) येथे गणेशोत्सव काळात राबविण्यात येणार आहे. या अंतर्गत घरोघरी व सार्वजनिक गणेशोत्सव मंडळात जमा होणारे निर्माल्य गोळा करण्यात येईल.

निर्माल्य पुनर्वापर प्रकल्प या अंतर्गत सन २०१२ मध्ये, क्षितीज ग्रुप तर्फे कल्याण (पुर्व) येथे अंदाजे ४ टन [४००० किग्र ] निर्माल्य गोळा करण्यात आले होते. निर्माल्याचे नैसर्गिक खत तयार करण्यात त्यांना यश आले होते. या वर्षी आणखी जोमात कार्य करण्याचे क्षितीज ग्रुपने ठरवले असून २०१३ म्हणजे यंदाच्या साली तिप्पट [१२ टन ] एवढे निर्माल्य गोळा करण्याचे प्रयत्न ते करू इच्छितात.

अशाच प्रकारे अनेक स्वयंसेवी संस्था, तरुण मंडळ, निसर्ग प्रेमी आणि महानगरपालिका आपापल्या परीने अशेच अनेक उपक्रम राबू पाहत आहेत. ठाणे, पुणे, नाशिक आणि मुंबई सारख्या शहरांत इको फ्रेंडली आणि प्रदूषण मुक्त गणेशोत्सवाचे क्रेझच आहे. गेल्या काही वर्षांत केलेल्या जनजागृतीचे आणि शिक्षणाचे 'positive' पडसात उमटत आहेत हि आनंदाची बाब.

पाणी, वातावरण व पर्यावरण याच्या प्रदूषणाचे काय? त्यामुळे क्षितीज ग्रुप तर्फे सगळ्यांस विनंती करण्यात येते की - आम्हाला [किंवा नजीकच्या स्वयंसेवी संस्थाना ] निर्माल्य दान करा. संपूर्ण निर्माल्याची केवळ खत निर्मिती करण्यात येईल.

हा उपक्रम यशस्वीरीत्या राबवून कल्याण आणि विक्रोळी शहरातील गणेशोत्सव पर्यावरण पुरक करण्यासाठी आपणाकडून अपेक्षा आहे. कारण ती देखील गणरायाची केलेली सेवाच असेल. तुमच्या कडील निर्माल्य जमा करण्यासाठी क्षितीज ग्रुपशी संपर्क साधावा.

कल्याण : ९०२९७९६४९६, ८०९७६१५८४३, ९२२१०२७३७३
विक्रोळी : ८६९३८४०६५८
email : kshitijgroupkyn@gmail.com


चला आता करूया एक पण, कोमेजलेले फुल वा जिर्ण झालेले पर्ण । नदी - नाल्या नव्हे, झाडांनाच करू अर्पण ।।


No comments:

Post a Comment